महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता.. रात्री ८ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - evm pranavda

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मुंबईत वाहतूक विभागाच्या डिजीटल बोर्डवर निकालाची माहिती मिळणार..कांदा चाळीत आग लागून एक हजार क्विटंल कांदा जळाला, 12 लाखांचे नुकसान.. तर अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासहित ९ जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना.. प्रणव मुखर्जी यांनी ईव्हीएम छेडछाडीवर व्यक्त केली चिंता.. अनेक सेलेब्रिटींसह कोट्यवधी इन्स्टाग्राम वापरकर्त्यांचा डाटा लीक

मुंबई

By

Published : May 21, 2019, 8:22 PM IST

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण; मुंबईत वाहतूक विभागाच्या डिजीटल बोर्डवर निकाल

मुंबई - लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी होणार असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. हे निकाल मुंबई शहरात वाहतुक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर निकालाची माहिती दिली जाणार आहे.

अधिक वाचा -

कांदा चाळीत आग लागून एक हजार क्विटंल कांदा खाक; 12 लाखांचे नुकसान

नाशिक - सटाण्याच्या जायखेडा येथे कांदा चाळीला आग लागून सुमारे एक हजार क्विंटल कांदा जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत चाळीतील मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा जळाला. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा -

अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासहित ९ जणांची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशमधील एका आमदारासहित ९ जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तिरोंग अबोह असे त्या आमदाराचे नाव आहे. ते नॅशनल पीपल्स पक्षाचे नेते आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

अधिक वाचा -

प्रणव मुखर्जी यांनी ईव्हीएम छेडछाडीवर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली - निवडणुक आयोगाने मतदान प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी ईव्हीएमच्या छेडछाडीवर चिंता व्यक्त केली आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवणे ही पूर्णपणे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

अधिक वाचा -

अनेक सेलेब्रिटींसह कोट्यवधी इनस्टाग्राम वापरकर्त्यांचा डाटा लीक, मुंबईतील कंपनीवर संशय

नवी दिल्ली - डाटा लीकप्रकरणी पुन्हा एकदा फेसबुक कंपनी अडचणीत सापडली आहे. कारण फेसबुकचीच मालकी असलेल्या इनस्टाग्रामच्या लाखो वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा डाटा मुंबईची सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी क्रित्रबॉक्सने मिळविल्याची कंपनीकडून चौकशी केली जात आहे.

अधिक वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details