राम मंदिर निर्माणासाठी अयोध्येतील जमीन अधिग्रहीत करा, सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र
नवी दिल्ली- भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिरासाठी अयोध्येतील जमीन अधिग्रहीत करण्याची मागणी केली आहे. मोदींना एक पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. त्याचबरोबर रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषीत करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर...
जम्मू काश्मीरमध्ये चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात आज (सोमवारी) पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. शोपियाँतील मोलू-चित्रगाम गावात ही घटना घडली.वाचा सविस्तर...
मूल होईना म्हणून हिंगोलीच्या दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या?
हिंगोली- शहरातील एका दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मूल बाळ होत नसल्याच्या निराशेतूनच दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला जात आहे. पूर्णा-नांदेड रोडवर पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. रमेश दत्तराव काचेवर (५२), रेखा रमेश काचेकर (४५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. वाचा सविस्तर...
CRICKET WORLDCUP: बांगला टायगर्सनी केली दक्षिण आफ्रिकेची शिकार; रोमांचक सामन्यात आफ्रिकेवर २१ धावांनी विजय
लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी बांगलादेशने ३३१ धावांचे आव्हान दिले होते. किंग्जस्टन ओव्हल, लंडन येथे रंगलेल्या रोमांचक सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात ७५ धावा आणि १ गडी बाद घेतल्यामुळे शाकिब अल हसनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. वाचा सविस्तर...
हृतिक रोशनच्या 'या' सुपरहिट गाण्यावर चीनमध्ये थिरकली यामी, व्हिडिओ व्हायरल
मुंबई - 'हँडसम हंक' हृतिक रोशन आणि यामी गौतम दोघेही सध्या चीनमध्ये त्यांच्या 'काबिल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले आहेत. भारतीय प्रेक्षकांनी 'काबिल' चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. भारतीय चित्रपटांना चीनी बॉक्स ऑफिसवरदेखील चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच हृतिक रोशन आणि यामीचा 'काबिल' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच यामी आणि हृतिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये यामी हृतिकसोबत त्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. वाचा सविस्तर...