महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता... सोमवार १० जून २०१९ रात्री ८ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या - Monoson

बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला - शरद पवार; संजय उवाच... मोदी, शाह, योगी हे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय; कठुआ बलात्कार व हत्या प्रकरण : ३ आरोपींना जन्मठेप, २ पोलिसांना ५ वर्षांची शिक्षा; कोकण किनारपट्टीवर येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासन सतर्क; प्रेमाचा प्रस्ताव अनेक वेळा धुडकावणारी हेजल अशी झाली युवराजची बायको...

संपादित छायाचित्र

By

Published : Jun 10, 2019, 7:59 PM IST

बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला - शरद पवार

नवी दिल्ली -बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीचे तिकिट देणे हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून भाजपवर निशाणा साधला. साध्वी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.वाचा सविस्तर...

संजय उवाच... मोदी, शाह, योगी हे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय

लखनौ -राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी, शाह, योगी हे आमच्यासाठी 'सर्वोच्च न्यायालय' असल्याचे म्हटले आहे. राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.वाचा सविस्तर...

कठुआ बलात्कार व हत्या प्रकरण : ३ आरोपींना जन्मठेप, २ पोलिसांना ५ वर्षांची शिक्षा

पठाणकोट -जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट कोर्टाने सरपंच सांझी रामसह ६ आरोपींना दोषी ठरवले आहे. सांझी रामसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, इतर २ पोलिसांना प्रत्येकी ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आठ आरोपींपैकी विशाल या एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उरलेल्या ७ जणांपैकी एक अल्पवयीन आहे..वाचा सविस्तर...

कोकण किनारपट्टीवर येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासन सतर्क

रायगड -
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या ४८ तासात रायगडसह कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्हा प्रशासन व आपत्ती प्रशासनाने किनारपट्टीच्या गावांना व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मच्छीमारी नौकानांही समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे.वाचा सविस्तर...

प्रेमाचा प्रस्ताव अनेक वेळा धुडकावणारी हेजल अशी झाली युवराजची बायको...

मुंबई- भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराजने २०११ ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर युवराज अभिनेत्री हेजल कीचबरोबर विवाहबंधनात अडकला.वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details