आम्ही वाढलेल्या गुणांची सूज कमी केली; घटलेल्या निकालावर तावडेंची अजब प्रतिक्रिया
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १२ टक्क्यांनी घटला आहे. या निकालावर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यापूर्वी देण्यात येत असलेले २० टक्के अंतर्गत गुण ही केवळ गुणाची सूज होती, आम्ही ती कमी केल्याने खरा निकाल लागला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तो विद्यार्थी त्या पद्धतीचे करिअर निवडू शकतो, त्यातून त्या विद्यार्थ्याला चांगली संधी मिळू शकेल, असा दावाही तावडे यांनी केला आहे. वाचा सविस्तर...
35+35+35+35+35+35=210; पुण्यातील विद्यार्थ्याच्या यशाचं गणित
पुणे - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. निकालनंतर चर्चा सुरू असते होते ती सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची. मात्र, पुण्याच्या एका विद्यार्थ्याचे नावही खुप चर्चेत येत आहे. सर्वाधिक गुण मिळविले म्हणून नाही, तर सर्व विषयामध्ये 35 गुण मिळविल्याने. श्रावण राजेश साळुंके असे त्या सर्वच्या सर्व विषयात तो 35 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.वाचा सविस्तर...
दूषित पाण्यातून कोळन्हावीच्या 40 जणांना विषबाधा; ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा
जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या कोळन्हावी गावातील 40 जणांना दूषित पाण्यातून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.वाचा सविस्तर...