महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - चेन्नई

चित्तथरारक सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईला नमवत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तारापूर औद्योगिक वसाहतीत वायुगळतीमुळे तिघांचा मृत्यू झाला, तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही विषबाधा झाली. पिवळ्या साडीवालीनंतर निळी ड्रेसवाली महिला पोलिंग अधिकारीचा फोटो व्हायरल. लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात एकूण ६३.३ टक्के मतदान झाले. हिंगोलीमध्ये १८ वर्षीय पुतण्याने ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमविवाह केला.

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..

By

Published : May 13, 2019, 12:05 AM IST

IPL 2019: मुंबई इंडियन्सची पोरं हुश्शार.. चित्तथरारक सामन्यात चेन्नईला नमवून आयपीएल विजेतेपदाचा चौकार

हैदराबाद - चित्तथरारक सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईला नमवत आयपीएलचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने एका धावेने विजय मिळवला.वाचा सविस्तर..

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायुगळतीत तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही विषबाधा
पालघर/वाडा - जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील कंपनीत विषारी वायू गळतीने ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, मृतदेहाची तपासणी करणाऱ्या तुंगा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना देखील विषारी वायुबाधा झाली आहे. वाचा सविस्तर..

पिवळ्या साडीवालीनंतर निळी ड्रेसवाली महिला पोलिंग अधिकारी व्हायरल, कोण आहे ही निलपरी ?
भोपाळ - गेल्या काही दिवसांपासून पिवळ्या साडीवाल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता निळ्या ड्रेसवाल्या महिला अधिकाऱ्याचेही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे आता ही महिला अधिकारी कोण असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. वाचा सविस्तर..

लोकसभा निवडणूक : सहाव्या टप्प्यात एकूण ६३.३ टक्के मतदान- निवडणूक आयोग
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकाचा सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिआ आज पार पडली. देशभरातील एकूण ५९ जागांसाठी ६३.३ टक्के मतदान झाले, अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली. वाचा सविस्तर..

धक्कादायक..! १८ वर्षीय पुतण्याचा ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमविवाह
हिंगोली - औंढा तालुक्यातील नाहद एका १८ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय चुलतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते. आज (रविवारी) त्यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले. मातृत्व दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची जिल्ह्यात चर्चा होत आहे. वाचा सविस्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details