शेवटी भीती जीवघेणी ठरली; नापास होणार म्हणून केली आत्महत्या, पण....
कोल्हापूर -मी इंग्रजीत नापास होणारच, ४ दिवसांपासून प्रणव घरी हेच सांगत होता. मित्रांना आणि आजूबाजूच्यांना निकाल काय सांगणार? हा एकच प्रश्न प्रणवच्या डोक्यात निकालाची तारीख जवळ येत असताना त्याला पडत होता. निकालची तारीख जाहीर झाली आणि प्रणवने भीतीपोटी आपले जीवन संपवले. मात्र, आज निकाल जाहीर झाला, आणि ज्याची भीती होती त्या विषयात तो पास झाला होता.वाचा सविस्तर...
माहेरच्यांनीच मुलीला १० लाखांत विकले, पतीची औरंगाबाद पोलिसात तक्रार
औरंगाबाद - माहेरच्या मंडळींनीच आपल्या विवाहित मुलीला भूल-थापा देत दहा लाख रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेच्या पतीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. सय्यद शकील सय्यद चांद अत्तार(वय- 40 वर्ष )असे तक्रार करणाऱ्या पतीचे नाव आहे. तर रिझवाना सय्यद (वय-32 वर्ष ) असे विवाहितेचे नाव आहे.वाचा सविस्तर...
दुर्दैवी ! वर्ध्यात रस्त्याचे काम करणाऱ्या मशीनने झोपलेल्या दोन मजूरांना चिरडले
वर्धा - आर्वी मार्गाच्या चौपदरीरणाचे काम सध्या सुरू आहे. मध्यरात्री दरम्यान महामार्गावर यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर मुरूम पसरविण्याचे काम सुरू होते. यावेळी मुरुमाच्या ढिगाऱ्यावर झोपलेले दोन मजूर ग्रेडर मशीनच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे आंजी जवळील पेट्रोलपंपजवळ घडली आहे. विठ्ठल भुजाडे आणि विलास दोंडीलकर असे मृत मजुरांची नावे आहेत.वाचा सविस्तर...
चंद्रकांत खैरेंना आणखी एक साक्षात्कार, म्हणाले - बाळासाहेबांकडे होती दैवीशक्ती
औरंगाबाद- बाळासाहेब ठाकरेंना किती दैवीशक्ती होती, हे मला प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. ते आज सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी आले होते.वाचा सविस्तर...
हृतिकच्या 'काबिल'कडे चिनी प्रेक्षकांची पाठ; ३ दिवसात केवळ इतकी कमाई
मुंबई - हृतिकच्या २०१७ मध्ये आलेल्या 'काबिल' या ड्रामा थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भारतात या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ५ जूनला हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चीनमधील हृतिकचे चाहते या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देतील, असा अंदाज वर्तवला जात होता. वाचा सविस्तर...