महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शुक्रवार ०७ जून २०१९ संध्याकाळी ७ पर्यंत महत्वाच्या बातम्यांवर एक नजर - crime

धाकधूक वाढली ! दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर; वंचित परवडली पण राष्ट्रवादी नको, काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर; पुण्यात नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू; शिवानी सुर्वेची स्ट्रगल स्टोरी : एकेकाळी रोजच्या जेवणासाठीही करावा लागायचा संघर्ष ; फोर्ब्जच्या 'सर्वात श्रीमंत ८० महिलांच्या' यादीत मूळ भारतीय वंशाच्या तिघींचा समावेश

संपादित छायाचित्र

By

Published : Jun 7, 2019, 6:59 PM IST

धाकधूक वाढली ! दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर

मुंबई -महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. तर उद्या (शनिवारी) ८ जूनला दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत सोशल मिडियावर अफवांचा पूर आला होता. त्यावर पडदा टाकत बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहे. विद्यार्थांना निकालाची प्रत संकेतस्थळावरुन घेता येणार आहे. वाचा सविस्तर....

वंचित परवडली पण राष्ट्रवादी नको, काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

मुंबई -लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसला चांगले यश मिळवायचे असेल तर यापुढे वंचित सोबत आघाडी केलेली बरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी नको, असा सूर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उमटला. राष्ट्रवादीसोबत विधानसभा निवडणुकीत गेलो तर आपला मूळ जनाधार परत येणार नसल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचे समोर आले आहे.वाचा सविस्तर....

पुण्यात नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

पुणे - नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेल्या एका ३ वर्षीय चिमुरड्याचा बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना पुण्याच्या कात्रज परिसरात मंगळवारी घडली. पिल्लू उर्फ समर सुलतान शेख, असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील सुलतान शेख यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.वाचा सविस्तर....

शिवानी सुर्वेची स्ट्रगल स्टोरी : एकेकाळी रोजच्या जेवणासाठीही करावा लागायचा संघर्ष

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्यापर्वातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणाऱ्यादेवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपली संघर्षकथा बिगबॉसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रसमोर पहिल्यांदाच मांडली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असण्यापासून ते समुद्रापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर घेण्यापर्यंतचा आपला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला.वाचा सविस्तर....

फोर्ब्जच्या 'सर्वात श्रीमंत ८० महिलांच्या' यादीत मूळ भारतीय वंशाच्या तिघींचा समावेश

न्यूयॉर्क - भारतीय महिला केवळ देशातच नव्हेतर विदेशातही यशाची पताका फडकवित आहेत. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या तीन उद्योजक महिलांनी फोर्ब्सच्या 'सर्वात श्रीमंत ८० स्वयंसिद्ध' यादीत स्थान पटकाविले आहे. या महिलांनी स्वत:च्या कर्तृत्वावर विविध उद्योगात उत्तुंग यश मिळविले आहे. वाचा सविस्तर....

ABOUT THE AUTHOR

...view details