महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

LIVE: नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची शपथ, हे असतील संभाव्य मंत्री. शिवसेनेकडून अरविंद सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब, मोदींच्या शपथविधीसोहळ्यात घेणार मंत्रीपदाची शपथ. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा समाजाला आरक्षण नाहीच. गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळ्यामध्ये खून, परिसरात खळबळ. जळगावकरांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे, झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर.

महत्वाच्या बातम्या

By

Published : May 30, 2019, 2:10 PM IST

LIVE: नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची शपथ, हे असतील संभाव्य मंत्री

नवी दिल्ली -पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. या वेळी, बिस्मटेकमधील देशांच्या प्रमुखांसह एकूण ८ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वाचा सविस्तर...

शिवसेनेकडून अरविंद सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब, मोदींच्या शपथविधीसोहळ्यात घेणार मंत्रीपदाची शपथ

मुंबई -शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री मंडळात शिवसेनेचे मंत्री म्हणून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. वाचा सविस्तर...

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा समाजाला आरक्षण नाहीच

नवी दिल्ली - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांना आरक्षण द्यायचे असल्यास वैद्यकीय आस्थापणांच्या जागा वाढविण्याचा सल्लाही न्यायालयाने सरकारला दिला आहे. वाचा सविस्तर...

गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळ्यामध्ये खून, परिसरात खळबळ

धुळे -गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळे शहराजवळील दोंडाईचा-सोनगीर रोडवर खून झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल मोतीलाल काबरा, असे खून झालेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. वाचा सविस्तर...

जळगावकरांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे, झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर

जळगाव -लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, जळगावात नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नाही तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details