मुंबई- कोरोनाविरुध्दच्या युद्धात लष्करातील पहिल्या फळीच्या सैनिकाप्रमाणे देशातील डॉक्टर , नर्सेस आणि अन्य आरोग्य सेवा देणारे कर्मचारी लढत आहेत. यांच्या सोबत औषधाच्या दुकानात काम करणारे कोरोना वारिअर्सही लढत आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणीच फारसे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. दिवसरात्र काम करणाऱ्या फार्मासिस्ट, मेडिकलमधील कर्मचाऱ्यांना 50 कि.मी. प्रवास करुन कामाच्या ठिकाणावर खासगी वाहनाने पोहोचावे लागत आहे.
Lockdown: सरकारी अपुऱ्या सेवांमुळे होतेय अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची गैरसोय - hemant jain
दिवसरात्र काम करणाऱ्या फार्मासिस्ट, मेडिकलमधील कर्मचाऱ्यांना 50 कि.मी. प्रवास करुन कामाच्या ठिकाणावर खासगी वाहनाने पोहोचावे लागत आहे.
मुंबईत केईम ,टाटा, जेजे अशा मोठमोठ्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आहेत. तिथे औषधाची दुकाने 24 तास खुली असतात याठिकाणी काम करणारे हे कर्मचारी जास्त संख्येने मुबईच्या बाहेरील उपनगरात राहणारे आहेत. लॉकडाऊनमुळे लोकल बंद झाल्याने आता त्यांना सरकारी बससेवा किंवा खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.
हेमंत जैन हा फार्मसिस्ट मुंबईपासून जवळ असलेल्या उल्हासनगर मध्ये राहतो. लॉकडाऊनमुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने रोज तो आपल्या दुचाकीने 50 कि.मी. प्रवास करत मुबाईतील त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. सरकारने बसेसची सेवा दिली आहे. परंतु, ती अपुरी असल्याने खासगी वाहनांच्याशिवाय पर्याय नाही असेही त्याचे म्हणणे होते.