मुंबई - जोगेश्वरीच्या क्रांतीनगर परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर, 22 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून ते आपल्या घरी परतले आहेत. हे रुग्ण घरी परतताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
जोगेश्वरीतील 11 रुग्ण कोरोनामुक्त, नागरिकांच्या स्वागताने झाले भावूक - benefits of lockdown
जोगेश्वरीच्या क्रांतीनगर परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर, 22 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून ते आपल्या घरी परतले आहेत.
या स्वागतामुळे कोरोनामुक्त नागरिक भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या सर्व नागरिकांची योग्य ती खबरदारी घेऊन उपचार केल्याबद्दल पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालिका प्रशासन, डॉक्टर, नर्स व पोलीस यंत्रणेचे आभार मानले आहेत.
राज्यात एकीकडे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने हे आरोग्य यंत्रणेचे मोठे यश आहे. तसेच नागरिकांसाठीही दिलासादायक बाब आहे.