महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Electrification of Konkan Railways Completed : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण; 150 कोटींहून अधिकची होणार बचत - कोकण रेल्वेचे विद्युतीकरण

देशातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वे ( Konkan Railways ) मार्गावर सुरू होते. मागील सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावरील सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले ( Electrification of Konkan Railway completed ) आहे. त्यामुळे वीजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर इंधन खर्चात लक्षणीय म्हणजेच 150 कोटींहून अधिक बचत होणार आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

Konkan Railways
Konkan Railways

By

Published : Mar 29, 2022, 8:43 PM IST

मुंबई -देशातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वे मार्गावर सुरू होते. मागील सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावरील सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे वीजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर इंधन खर्चात लक्षणीय म्हणजेच 150 कोटींहून अधिक बचत होणार आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

एक हजार 287 कोटी रुपये खर्च -कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेच्या संपूर्ण 741 किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर, 2015 मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 287 कोटी रुपये आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च, 2020 पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली. रत्नागिरी आणि थिविम दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याची सीआरएस तपासणी 24 मार्च, 2022 रोजी करण्यात आली तर 28 मार्च, 2022 रोजी अधिकृत मान्यता मिळाली आहे.

150 कोटींहून होणार बचत -कोकण रेल्वेचा कठीण भूभाग आणि कोरोना महामारीमुळे प्रतिकूल वातावरणात हा विद्युतीकरण प्रकल्प आव्हानात्मक होता. शिवाय कोकण प्रांतात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बारा डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एक किलोमीटर धावण्यासाठी सुमारे 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. विजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर इंधन खर्चात लाक्षणीय अर्थात 150 कोटींहून अधिक बचत होणार आहे. विद्युतीकरणाकडे वाटचाल, मिशन 100 टक्के विद्युतीकरण, शून्य कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल, हेउद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वे ( Indian Railways ) मिशन मोडवर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने ( Konkan Railways ) हरित वाहतुकीच्या ( Green Transport ) दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हेही वाचा -Aryan Khan Drug Case : के. पी. गोसावीचा जबाब नोंदवणे बाकी; आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCB ने न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला

ABOUT THE AUTHOR

...view details