मुंबई - लोकसभा निवडणुकांची घोषणा रविवारी होताच देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून देशात ७ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. तर, २३ मे ला मतमोजणी होणार आहे. राज्यात ४ टप्प्यात मतदान होणार आहे.
देशभरात एकूण ५४३ जागांसाठी ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत ७ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ४ टप्प्यांमध्ये म्हणजेच ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल. कुठल्या मतदार संघात कधी होणार मतदान ते पुढील प्रमाणे,
पहिला टप्पा (७ जागा)
मतदानाची तारीख - ११ एप्रिल
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशीम, चंद्रपुर