ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Shinde Meeting on Weather : अवकाळी, गारपीटामुळे झालेल्या नुकसानीचे मुख्यमंत्री आज घेणार आढावा बैठक - राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते

राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे मका, हरभरा, गहू, केळी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील आज बैठक घेणार आहेत.

eknath shinde avkali adhava Metting
गारपीटचा मुख्यमंत्री घेणार आढावा
author img

By

Published : Apr 10, 2023, 10:24 AM IST

मुंबई : अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तात्काळ आढावा बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहात दुपारी एक वाजता बैठक होणार असून यावेळी उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आदी संबंधित खात्याचे विभागीय अधिकाऱ्यांना या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



उपाययोजनावर आढावा बैठक: राज्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. पावसाने हा अंदाज खरा ठरवत विदर्भ, मराठवाडा, कोकण, नाशिक आदी भागात सोसाट्याच्या वारा आणि गारपीटसह झालेल्या पावसाने झोडपून काढले. ज्वारी, हरभरा, मका सारख्या पिकांसह आंबा, काजू, द्राक्ष आदी फळपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आढावा बैठक बोलावली आहे. शेतीचे झालेले नुकसान आणि त्यावरील उपाययोजनावर चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह आयोध्या दौऱ्यावर गेल्यावर टीका विरोधकांनी केली होती.



नैसर्गिक आपत्तीच्या यादीत समाविष्ट: बदलत्या वातावरणामुळे सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी लागते. राज्य सरकारने अवकाळी पाऊस हा नैसर्गिक आपत्तीच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसाची परिभाषा निश्चित करून शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि मदत मिळावी, हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत. यासंदर्भात नियोजन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त नेमली असून सततच्या पावसासाठी या समितीत निकष निश्चित करण्यात आले आहेत.



संविधानिक कर्तव्याचा विसर: आधीच शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असताना, पुन्हा पावसामुळे राज्यातील बळीराजा अडचणीत आला आहे. परंतु, शिंदे सरकारला संविधानिक कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. तसेच श्री रामाच्या दर्शनासाठी भक्ती भावाने एकटे गेले असते, तर राज्यामधील लोक समजू शकले असते. परंतु संबंध मंत्रिमंडळ, आमदार, खासदार व कार्यकर्त्यांना घेऊन जाणे, म्हणजे राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासे म्हणाले.

हेही वाचा: Unseasonal Rain नाशिक जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस रब्बी पिकांचे मोठे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details