महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Trans Harbor Link : शिंदे, फडणवीसांनी केली मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) कॉरिडॉरची चाचणी मोहीम घेतली. याच्या डेकचे संपूर्ण काम आज पूर्ण झाले.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस

By

Published : May 24, 2023, 11:00 PM IST

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्माणाधीन मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची (MTHL) पाहणी केली. यावेळी त्यांनी MTHL ओलांडणाऱ्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवला.

प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण : या प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूभागावरील न्हावा यांना जोडणारा अंदाजे 22 किमी लांबीचा 6 लेनचा (3+3 लेन 2 आपत्कालीन लेन) पूल आहे. याबाबत बोलताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांनी सांगितले की 'प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम आम्ही या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करू.

कारमधून टेस्ट ड्राइव्ह केले : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलावर एमएमआरडीए अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बेस्टच्या खुल्या डेकवर प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला. डेक स्लॅबचे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर लेक्सस कारमध्ये शिंदे आणि फडणवीसांनी कारमधून टेस्ट ड्राइव्ह केले. फडणवीस यांनी स्टेअरिंग घेतले तर शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते. त्यांनी नवी मुंबईच्या दिशेने 10 किमी गाडी चालवली. त्यांनी 40 मिनिटांत जवळपास 14 किमी प्रवास केला.

परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'आगामी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) मुंबई आणि नवी मुंबईच्या परिसरात एका नवीन मेगापोलीसची पायाभरणी करेल. हा प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल'. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, MTHL मुळे जमिनीवरील वाहतुकीच्या सर्व अडचणी दूर होतील. यामुळे चिर्ले रायगड परिसरात सर्वांगीण विकास होऊ शकतो. MTHL व्यतिरिक्त, एक मल्टी मॉडेल कॉरिडॉर आणि इतर प्रकल्प देखील येत आहेत. नवी मुंबईतील MTHL च्या दुसर्‍या बाजूला डेटा सेंटरच्या विकासासाठी 65 टक्के वाव आहे आणि तेथे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. पुढील 20 वर्षांसाठी MTHL अर्थव्यवस्थेला चालना देईल'.

हेही वाचा :

  1. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
  2. Mumbai Police Death : दोन दिवसाआड होते एका पोलिसाचा मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर
  3. Suspected Bomb : नवी मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन; चौकशीत माहिती उघड

ABOUT THE AUTHOR

...view details