महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परिवर्तन निश्चित आहे; 'मुंबई सर्वांसाठी' हे ब्रिद आम्ही निश्चितपणे पूर्ण करू - एकनाथ गायकवाड - काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड

मुंबई आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित होईल. गरीबाला ६ हजार महीन्याला देऊन वर्षाला ७२ हजार देऊ. मुंबई सर्वांसाठी हे ब्रिद आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड

By

Published : Mar 30, 2019, 3:18 PM IST

Updated : Mar 30, 2019, 3:39 PM IST

मुंबई -दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघातील दलित, अल्पसंख्याक मतांवर काँग्रेसचा भर आहे. मात्र, त्याचा काँग्रेसला किती फायदा होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्याशी बातचित केली ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी.....

काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड

देवाधर्माचा वापर करून भाजप-सेना सत्तेत आली आहे. काँग्रेसचे राजकारण विकासाचे आहे. सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन मुंबईचे परिवर्तन करणार असल्याचे मुंबई दक्षिण- मध्यचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी ई-टिव्ही भारतशी बोलताना सांगितले. मुंबईतले ७० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. सर्वांना ५०० स्वेअर फुटाचे घर देण्याची काँग्रेसची योजना असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसने धारावीत स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारला. यांनी त्याचे खासगीकरण केले. धारावी पुर्नविकासाला आताच्या सत्तेतल्या लोकांनी विरोध केला. राजकीय जुमला करुनही ५ वर्षात धारावीकरांना काहीही दिले आहे. पुर्नवसनासाठी रेल्वेची जमीन आमच्याच काळात देण्याचे निश्चित केले होते. शिवसेनेची बोली आणि कृती यात फरक आहे. चौकीदार चोर म्हणणारे उद्धव ठाकरे औरंगजेब अमित शहाचा निवडणूक अर्ज भरायला जातात. ही जनतेची शुध्द फसवणूक आहे. जनता सत्ताधाऱ्यांना मतदानातून धडा शिकवून काँग्रेसला हात देईल.

भाजप-सेनेच्या कार्यकाळात अल्पसंख्याक आणि दलितांना दुय्यम वागणुक दिली. अत्याचार करुन व्हिडिओ व्हायरल केले. हे भयंकर कृतीवरून दलित आणि मुस्लिम भयभीत आहेत. काँग्रेस देशात निश्चित परिवर्तन आणणार आहे. मुंबई आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित होईल. गरीबाला ६ हजार महीन्याला देऊन वर्षाला ७२ हजार देऊ. मुंबई सर्वांसाठी हे ब्रिद आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला.

Last Updated : Mar 30, 2019, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details