महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंडरवर्ल्डमधील मांडवली बादशहा सलीम महाराजला अटक - Ejaj lakdawalas underling Saleem Maharaj

पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यानंतर एजाज लकडावाला याच्या खास हस्तकाला अटक केली आहे. सलिम महाराज उर्फ बटरफ्लाई उर्फ मांडवली बादशाह असे अटक केलेल्या हस्तकाचे नाव आहे.

Ejaj lakdawalas underling Saleem Maharaj
सलीम महाराज

By

Published : Jan 27, 2020, 11:16 PM IST

मुंबई- पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यानंतर एजाज लकडावाला याच्या खास हस्तकाला अटक केली आहे. सलिम महाराज उर्फ बटरफ्लाई उर्फ मांडवली बादशाह असे अटक केलेल्या हस्तकाचे नाव आहे.

खंडणीसाठी ज्या व्यावसायिकाला धमकी द्यायची असेल, त्या व्यावसायिकाची रेकी करुन त्याची संपुर्ण माहिती सलिम महाराज हा एजाज लकडावालाला द्यायचा. त्या आधारे एजाज लकडावाला हा व्यावसायीकांकडून लाखो करोडोंची खंडणी उकळायचा. सलिम महाराज याची अटक म्हणजे छोटा शकील गँगला मोठा धक्का मानला जात आहे.

सलीम महाराज हा एजाज लकडावाला याच्या संपर्कात राहून दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार छोटा शकीलसाठीही काम करीत होता. देशात छोटा शकिलच्या सोने व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी सलीम महाराज उर्फ बटरफ्लाई हा गेली अनेक वर्षे काम करीत होता. या बरोबरच गुन्हेगारी जगतात सलीम महाराज हा पोलीस, राजकीय नेते आणि गँगस्टर यांच्याशी सेटलमेंट करुन मांडवली करायचा. त्यामुळे तो मांडवली बादशहा म्हणून ओळखला जात होता. दुबईहून भारतात हवाईमार्गे सोने तस्करी करणाऱ्या गँगचा म्होरक्या म्हणूनही सलीम महाराज हा काम करत होता. त्यामुळे तो बटरफ्लाय या नावाने ओळखला जात होता.

ABOUT THE AUTHOR

...view details