मुंबई - लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर गावाकडे निघाले आहे. त्याचबरोबर मुंबईतून आता भूमिपुत्र सुद्धा गावाकडची वाट धरली असून महाराष्ट्रातील मजुरांची मोठ्या प्रमाणात मुंबईत गैरसोय होत आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे वेतन वेळेवर मिळत नसल्याने महाराष्ट्रातील मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. याबाबत आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'ने
'भूमिपुत्र मजुरांसाठी सोय करा'
हाताला काम मिळावे या आशेने मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातून मंजूर वर्ग मुंबईत येतात. परप्रांतीय मजुरांबरोबरच यात महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातूनही मराठी मजुर कामासाठी मुंबईत येतात. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन केला. यामुळे मुंबईत काम करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल झाले होते. यात मराठी मजुरांचाही समावेश होता
यातना सहन आम्ही घरी पोहचलो. मात्र गेल्या वर्षी सुद्धा शासनाकडून परप्रांतीय मजुरांसाठी श्रमिक ट्रेन चालवल्या होत्या. मात्र, मुंबईत काम करणाऱ्या भूमीपूत्र मजुरांसाठी काही सोय केली नव्हती. परिणामी खाजगी गाड्या कडून आम्हाला गाव गाठावे लागले होते. आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. राज्य शासनाने भूमिपुत्र मजुरांसाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्यातील मजूर लोकेश भुसारी यांनी दिली आहे.
वाढत्या कोरोना विषाणूमुळे पुन्हा राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. भूमिपुत्र मजूर सूरज राऊत यांनी सांगितले की, सध्या कामावरून वेतन मिळेल नाहीत. कडक निर्बंधांमुळे मुंबईत महागाई वाढलेली असून आमच्या जवळचे पैसे संपत आलेले आहे. त्यामुळे इथे उपाशी मरण्यापेक्षा गावाकडे जाऊन मिळेल ते काम करण्याचा आता मी निर्णय घेतलेला आहे. सध्या माझ्याकडे आठशे रुपये वाचले आहे. या आठशे रुपये घेऊन गावाकडे निघालो आहे. अशी भावनाही यावेळी मजुरांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-चार तास दुकाने सुरू ठेवल्यास गर्दी होईल; व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाची प्रतिक्रिया