मुंबई -धारावीमध्ये बुधवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी धारावी येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परिस्थितीची पाहणी केली. डीसीपी, धारावीचे दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. लोकांनीही बाहेर न पडता घरात राहावे आणि घाबरून जावू नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून परिस्थितीची पाहणी - धारावी कोरोना रुग्ण मृत्यू
धारावी आणि परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांना लॉकडाउनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. धारावी वासियांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
धारावी आणि परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांना लॉकडाउनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. धारावी वासियांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आपणास निवेदन करते की, प्रशासनाला सहकार्य करा. शासनाच्या सूचनांचे पालन करा व आपण घराच्या बाहेर पडू नका, असे गायकवाड म्हणाल्या.