महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'किशोर गोष्टी' उपक्रम हा बालमनाला उभारी देणारा- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

गेल्या ५० वर्षांत किशोर मासिकाने माझ्यासारख्या अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहे, अशी प्रतिक्रिया किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्त शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

education minister varsha gaikwad on kishor magazine
education minister varsha gaikwad on kishor magazine

By

Published : Mar 26, 2021, 5:09 PM IST

मुंबई - माझ्या लहानपणी मी किशोर मासिक आवर्जून वाचायचे. त्यातील गोष्टी, कविता, रंगीबेरंगी चित्रं, कोडी याचा खूप चांगला परिणाम माझ्यावर झाला. वाचनाची खूप आवड असल्याने माझे बालपण समृद्ध झाले. गेल्या ५० वर्षांत किशोर मासिकाने माझ्यासारख्या अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहे, अशी प्रतिक्रिया किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्त शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. तसेच किशोरी गोष्टी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या आहेत.

50 आठवडे चालणार उपक्रम -

बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाला ५० वर्षे पूर्ण झाले आहे. किशोरचे हे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील विद्यार्थ्यांना 50 आठवडे गोष्ट ऐकायला मिळणार आहे. किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालभारतीने हाती घेतलेल्या किशोर गोष्टी या उपक्रमात मान्यवर बालसाहित्यिक परिसरामध्ये प्रकाशित झालेली त्यांच्या गोष्टी मुलांना सांगणार असून 27 मार्चपासून दर शनिवारी आपल्याला एक गोष्ट ऐकता आणि पाहता येणार आहे. प्रसिद्ध लेखक, लेखिका, कलावंत सादर करणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्र्यांकडून उपक्रमास शुभेच्छा -

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना म्हणाले की, गोष्ट प्रत्येकालाच आवडते. तुम्ही लहान मुले तर गोष्टीसाठी कायम अधीर असतात. माणूस सुखात असो की दुःखात असो, माणसाला सोबत लागते आणि ही सोबत करण्याचे काम गोष्ट करते. मुळात माणूस हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. माणसाने आपल्या सभोवती दिसणाऱ्या सृष्टीची गुढे उकलण्याचा प्रयत्न बुद्धीच्या साहाय्याने सुरू यातून अनेक कल्पनारम्य गोष्टींचा जन्म झाला. मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यात गोष्टींची भूमिका खूप महत्त्वाची आहे. गोष्टींमुळे मुलांच्या मनाला कल्पनेचे पंख फुटतात. त्यांच्यातील साहसी वृत्ती विकसित होते. गोष्टी वाचणाऱ्यांची विनोदबुद्धी कायम शाबूत राहते. मुलांमधील कितीतरी अप्रगट सुप्त शक्तींना आवाहन देण्याचे काम या गोष्टी करतात. जीवनाकडे पाहण्याचा स्वच्छ आणि सुंदर दृष्टिकोन देण्याची ताकत गोष्टींमध्ये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details