महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्षा गायकवाड यांच्या ऑनलाईन शिक्षण पुरवण्यासाठीच्या मागणीला दूरदर्शनकडून केराची टोपली - varsha gaikwad news

रेड झोन मधील शाळा आम्हाला आताच सुरू करायच्या नाहीत. मात्र, ग्रामीण भागातील शाळा लवकरच सुरू केल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहोत. मुलांचे आयुष्य महत्त्वाचे आहे, त्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आम्ही ऑनलाइन शिक्षण आणत आहोत. यासाठी राज्यातील सर्व तज्ञ आणि पालक संघटनांशी चर्चा केली असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

education minister varsha gaikwad
वर्षा गायकवाड

By

Published : Jun 16, 2020, 7:38 PM IST

मुंबई- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण पुरवण्यासाठी दूरदर्शन व केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जात असल्याची कबुली गायकवाड यांनी दिली.

आपण अनेकदा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय, दूरदर्शन यांच्याकडे सतत पत्रव्यवहार करत असून आपल्याला त्यासाठी दाद मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही त्यासाठी विनंती केली होती. परंतु अद्याप आपल्याला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यामुळेच आपण टाटा स्काय आणि जिओ या खासगी कंपन्यांच्या वाहिन्यांचा पर्याय निवडला असल्याचे, गायकवाड म्हणाल्या.

राज्यात सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून राज्यभरात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाची माहिती दिली. जुलैमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होत असून त्यासाठी आम्ही या वर्गाची पुस्तके बाजारात उपलब्ध केली आहेत तसेच ऑनलाइन देखील ठेवली आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी राज्यभरात 'दीक्षा' या अॅपचा वापर चांगला होत आहे. ज्याठिकाणी स्मार्ट फोनचा वापर होत नाही. त्यांच्यासाठी इतर पर्याय लवकरच आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

रेड झोन मधील शाळा आम्हाला आताच सुरू करायच्या नाहीत. मात्र, ग्रामीण भागातील शाळा लवकरच सुरू केल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहोत. मुलांचे आयुष्य महत्त्वाचे आहे, त्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आम्ही ऑनलाइन शिक्षण आणत आहोत. यासाठी राज्यातील सर्व तज्ञ आणि पालक संघटनांशी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड माहिती देताना..

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीचा विषय आणला जाईल. बारावीचा अभ्यासक्रम बदलला असून त्याच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऑनलाइन शिक्षणाच्या संदर्भात पालकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे, तो लवकरच दूर होईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details