महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; एडेलवाईजच्या व्यवस्थापकीय संचालकाची आठ तास चौकशी - कला दिग्दर्शक नितीन देसाई

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी (Nitin Desai Suicide Case) एडलवाईज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची आठ तास चौकशी करण्यात आली आहे. एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Nitin Desai Suicide Case
Nitin Desai Suicide Case

By

Published : Aug 8, 2023, 9:46 PM IST

अतुल झेंडे यांची प्रतिक्रिया

मुंबई : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी (Nitin Desai Suicide Case) एडलवाईज फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना खालापूर पोलिसांनी नोटीस पाठवून आठ ऑगस्टला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एडलवाईज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह तीन पदाधिकारी पोलीस चौकशीसाठी हजर झाले होते. पोलिसांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

8 तास कसून चौकशी : एडलवाईज कंपनीच्या चार पदाधिकाऱ्यांची खालापूर पोलिसांनी 8 तास कसून चौकशी केली आहे. पोलिसांच्या नोटीस नुसार कंपनीचे अधिकारी आवश्यक कागदपत्रे घेऊन आले होते. काही कागदपत्रांची माहिती अपूर्ण होती. म्हणून पुन्हा एडलवाईज कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा 11 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एडलवाईज कंपनीचे एकूण 4 प्रतिनिधी हजर होते. एडलवाईज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्रनाथ काकरला यांची कसून चौकशी केली असून, अन्य तिघांची नावे सांगण्यास अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे यांनी नकार दिला आहे. 'ईटीव्ही भारत'ने झेंडे यांना अन्य तीन पदाधिकाऱ्यांची नावे विचारली असता त्यांनी योग्य वेळी नावे सांगू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पुन्हा 11 ऑगस्टला चौकशी :एडलवाईज कंपनीच्या चार पदाधिकाऱ्यांची मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. पुढील चौकशीसाठी पुन्हा 11 ऑगस्टला पोलिसांनी बोलावले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ईसीएलचे चेअरमन रशेश शहा यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

संचालकांना पुन्हा नोटीस : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्टला कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान ३०६, ३४ अन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर 5 ऑगस्टला ECL कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस पाठवून पोलिसांनी कागदपत्रांसह हजर राहण्याची समज दिली होती. त्याप्रमाणे मंगळवारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्रनाथ काकरला यांच्यासह इतर तीन पदाधिकारी कागदपत्रांसह हजर होते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांनी हजर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सकाळी 10 ते 6.30 वाजेपर्यंत करण्यात आली. त्यामध्ये काही माहिती अपुर्ण तसेच विस्तृत स्वरूपात नसल्याने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Nitin Desai Suicide Case : माझा स्टुडिओ गिळण्याचा प्रयत्न! देसाईंचा ऑडिओ क्लीपमध्ये आरोप
  2. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल
  3. Nitin Desai News :लालबागच्या राजाला मृत्यूपूर्वी देसाईंनी केला अखेरचा नमस्कार... ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांकडे काय केली मागणी?

ABOUT THE AUTHOR

...view details