मुंबई - खासगी क्षेत्रातील येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील घरावर शुक्रवारी संध्याकाळी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) धाड टाकली. त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील 'समुद्र महल' या निवासस्थानी ईडीने शुक्रवारी संध्याकाळी धाड टाकली. ईडीने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर वरेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, येस बँकेवर कर्जाचा एनपीए वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यातून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहेत. तसेच येस बँकेच्या खातेदारांना ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास आरबीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा -'येस बँकेत आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणा'
हेही वाचा -'नो येस बँक', राहुल गांधींनी सरकारवर केला अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप..