महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ed's action : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक

ईडी (Ed) म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने (Directorate of Enforcement) श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे (Shri Chhatrapati Shivaji Education Society) माजी अध्यक्ष महादेव देशमुख ( Mahadev Deshmukh) यांना कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अटक केली आहे. देशमुख यांना 18 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ED
ईडी

By

Published : May 9, 2022, 6:09 PM IST

मुंबई: ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव रामचंद्र देशमुख यांना कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. देशमुख यांना 18 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. महादेव रामचंद्र देशमुख यांनी 1992 मधे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि कर्नाटक सोसायटी रजिस्टर कायदा 1960 अंतर्गत संस्था नोंदणीकृत आहे. सोसायटीची नोंदणीकृत कार्यालये धारवाड, कर्नाटक आणि कोल्हापूर, महाराष्ट्र येथे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details