महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोसळधार..! घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप - water

आज सकाळपासूनच कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत.

घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले

By

Published : Jul 8, 2019, 1:09 PM IST

मुंबई- आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत.

घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले
घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम झुणझुणवाला कॉलेजच्या समोरील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे रस्त्यातून वाट काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सखल भागात साचलेल्या या पाण्याचा लवकरात लवकर निचरा झाला नाही. दरम्यान, येत्या काही वेळात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यास हे पाणी रेल्वे ट्रॅकवर येण्याची दाट शक्यता असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details