मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलसेवेवरही मुसळधार पावसाचा परिणाम जाणवत आहे. तसेच, अनेक भागात पाणी साचल्यामुळे मुंबईसह ठाणे आणि कोकण भागातील खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पावसाने उडवली दाणादाण; मुंबईसह ठाणे, कोकण भागातील शाळांना सुट्टी जाहीर
शाळा आणि महाविद्यालयात जाताना विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाऊस कोसळत असल्याने सर्वच ठिकाणच्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.
पावसाने उडवली दाणादाण; मुंबईसह ठाणे, कोकण भागातील शाळांना सुट्टी जाहीर
शाळा आणि महाविद्यालयात जाताना विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाऊस कोसळत असल्याने सर्वच ठिकाणच्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. लोकल धिम्या गतीने धावत आहेत तर रस्त्यांवरही पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन आशिश शेलार यांनी ट्विटरवरुन केले आहे.