महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shraddha Murder Case : आफताब पूनावालाला गांजा पुरवणारा ड्रग्ज पेडलरला सुरत येथून अटक - श्रद्धा वालकर

आफताब आणि श्रद्धाच्या अनेक मित्रांनी सांगितले की, आफताब ड्रग्ज सेवन करत असे. श्रद्धा हत्याकांड प्रकरण ( Shraddha Murder Case ) आता गुजरातशी जोडले गेले आहे. गुजरात पोलिसांनी सुरतमधून एका ड्रग्ज तस्कराला अटक केली, जो आफताबचा ड्रग सप्लायर असल्याचा संशय आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 28, 2022, 6:15 PM IST

मुंबई :श्रद्धा हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. सुरतमध्ये आफताबशी संबंध असल्याच्या संशयावरून अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्स तस्कर फैजल मोमीन याला सुरतमध्ये ड्रग्जच्या छाप्यादरम्यान अटक ( Drug peddler arrested ) केली आहे. फैसल हा आफताबचाही ड्रग्ज सप्लायर असल्याचा संशय आहे. तो वसई पश्चिमेतील आफताबच्याच घरात राहिला होता.

श्रद्धा हत्या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन ? -फैजल आणि आफताबचे अनेक कॉमन मित्र आहेत. आफताब त्याच्या संपर्कात कसा होता हे जाणून घेण्यासाठी गुजरात पोलीस फैजलच्या कॉल रेकॉर्डवरून तपास करणार आहेत. आफताब आणि श्रद्धाच्या अनेक मित्रांनी सांगितले की, आफताब ड्रग्ज सेवन करत असे. श्रद्धा हत्याकांड प्रकरण ( Shraddha Murder Case ) आता गुजरातशी जोडले गेले आहे. गुजरात पोलिसांनी सुरतमधून एका ड्रग्ज तस्कराला अटक ( Drug peddler arrested ) केली, जो आफताबचा ड्रग सप्लायर असल्याचा संशय आहे.

आफताबच्या ड्रग्स पुरविणारा अटकेत -अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव फैसल मोमीन असे असून तो आफताबचा ड्रग्ज सप्लायर असल्याचा संशय आहे. कारण फैसल वसई पश्चिम येथे राहत होता. आफताब श्रद्धासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी त्याच परिसरात राहिला होता. गुजरात पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल आणि आफताब यांचे परस्पर मित्र असावेत असा संशय असल्याने पोलिस फैसलचे फोन रेकॉर्ड तपासतील.

आफताब ड्रग्सच्या आहारी - ही घटना घडली जेव्हा गुजरात पोलिसांनी नियमित तपासणीत सुरतमध्ये चार व्यापाऱ्यांना अटक केली होती. त्यापैकी एक फैसल होता. अटक करण्यात आलेल्या चार ड्रग्ज तस्करांपैकी दोघे मूळचे मुंबईचे आहे. फैसल आणि अनिकेत शिंदे हे मीरा रोडचे आहेत. महत्वाचे कारण आफताब आणि श्रद्धाच्या अनेक मित्रांनी दावा केला आहे की, आफताब ड्रग्सचे सेवन करत असे. खरं तर, यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी खुलासा केला होता की,आफताबने पोलिसांना 'तो ड्रग्ज व्यसनी आहे' असे सांगितले. खुनाच्या दिवशीही (१८ मे रोजी) तो गांजाच्या नशेत होता, असा दावाही त्याने केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details