ठाणे : कल्याण डोंबिवली शहरासह आसपासच्या शहारत विविध प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री मोठ्याप्रमाणात वाढली आहे.कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबवली रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या इराणी कबिल्यात गेल्या 2 वर्षापासून आतापर्यत पोलिसांनी 50 हुन अधिक सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. याविरोधात विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाकडून नशेच्या सौदागरांना सापळा रचुन मुद्देमालासह अनेकांना अटक कोली आहे. कल्याण कसारा लोहमार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाच्या लागून असलेल्या इराणी कबिल्यात राहणारी सबा ही आंबिवली, मोहने, तसेच आसपासच्या परिसरात मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जसह चरस, गांजा या अंमली पदार्थाच्या नशेचा व्यापार करत असल्याची गुप्त माहिती कल्याण मधील खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.
ड्रग्ससह चरसचा साठा आढळला: या गुप्त माहितीच्या आधारे, मंगळवारी खडकपाडा पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवली परिसरात असेलेल्या एका बेकरी समोर सापळा रचला होता. त्यावेळी इराणी कबिल्यातील सबा ही संशयित रित्या आढळून आली. पोलिस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर सबाची पोलिसांनी अधिक चौकशी करून झाडाझडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला.
मंगळवारी आंबिवली परिसरात असेलेल्या एका बेकरी समोर सापळा रचला होता. त्यावेळी इराणी कबिल्यातील सबा ही संशयित रित्या आढळून आली. त्यावेळी तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला. - सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त
जिल्हा सत्र न्यायालयात हजर: दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी तिच्याकडून एम डी ड्रग्जसह चरस, गांजा हस्तगत केला. तिच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून, तिला अटक केली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या ड्रग डीलर सबाला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. आता खडकपाडा पोलीस एमडी ड्रग्स आणि चरस, गांजा आरोपी सबाने कुठून आणले आणि ती कोणाला विक्री करत होती. याचा तपास पोलीस पथकाने सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली आहे.