हैदराबाद -कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. ओमायक्रॉन नावाच्या या व्हेरिएंटचे आतापर्यंत भारतामध्ये 35 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या व्हेरिएटंचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. एकंदरीतच या रोगाचा प्रसार वाढत असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे. हा नवीन व्हेरिंएंट मानवाला किती हानीकारक आहे? कोरोनाची लस घेतलेले नागरिक याचा सामना करु शकणार की नाही? बुस्टर डोस घ्यावा की नाही? नागरिकांनी काय काळजी घ्यावी, या विषयावर चर्चा करण्यासाठी ईटीव्ही भारतने अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉ. रवी गोडसे यांच्यासोबत संवाद साधला. ( Dr. Ravi Godse USA Special Interview with ETV Bharat ) डॉ. गोडसे हे अमेरिकेतील पेनसिल्वेनिया मेडिकल कन्सल्टेशनचे अध्यक्ष आहेत. ( Dr. Ravi Godse President, Pennsylvania Medical Consultation )
प्रश्न - सर, ओमायक्रॉन हा व्हेरिएंट नेमका काय आहे? याबाबत आमच्या प्रेक्षकांना सांगाल.
उत्तर -हा व्हेरिएंट जेव्हा आला तेव्हा लोक घाबरले होते. तेव्हा मी ट्विटरवर एक प्रश्न विचारला होता. आपण केसेस आल्या आहेत म्हणून ओमायक्रॉन शोधतोय की ओमायक्रॉनची बातमी आली आहे म्हणून त्याच्या केसेस शोधतोय? तो जर इतका धोकादायक असेल तर त्याने ते दाखवायला हवे. ओमायक्रॉन हा B1.1.529 हे एक mutated version आहे. हा आरएनए व्हायरस आहे. तो बदलत असतो. तो खूप नाही बदलत. आधी कोरोना झालेल्यांना तो चकवा देऊ शकतो. कदाचित ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना तो चकवा देऊ शकतो. पण चकवा दिला तरी तो इतका धोकादायक नाही. त्याची लक्षणे सौम्य आहेत. तर दुसरीकडे भारतात कोट्यवधी लोक आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची लहर घाबरल्यामुळे आपण आणली. ओमायक्रॉनमुळे लहर नाही येणार.
प्रश्न - महाराष्ट्र सरकारने बुस्टर डोस देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. कोरोना प्रतिबंधासाठीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना बुस्टर डोसची आवश्यकता आहे का?
उत्तर -हो. मी आधी म्हणत होतो की बुस्टरची गरज नाही. मात्र, विषाणू बदलल्यावर, नवीन माहिती आल्यावर बदलणे गरजेचे आहे. कोरोना झाला असला तरी लस घ्यायला हवी. कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. तसेच त्यातली कोट्यवधी लोकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे दोन डोस लसीचे आणि झाला होता कोविड तो एक डोस बुस्टरचा, असे भारतीय लोकांचे होऊन जाईल, असे मला वाटले होते. आरटीपीसीआर टेस्ट सर्वांनी केली नव्हती. तसेच Antibody टेस्ट केली तर तो लसीमुळे कोरोनाची लागण होऊ शकते किंवा आधीच्या आजारपणामुळेही. त्यामुळे Antibody test चेक करा, असं मी म्हणत नव्हतो. पण आता अमेरिकेतही 60 टक्के लोकांनी लस घेतली आहे. तर 30 टक्के लोकांनी घेतली नाही. लस घेतलेल्या लोकांचे संरक्षण होत होते. यानंतर डेल्टा आला. डेल्टामुळे लस घेतलेल्यांनाही थोडा धोका होता. तो इतर पसरू शकत होता. म्हणून त्या लोकांना तो होऊन तो पसरवून, तो म्यूटेड होऊन तो Unvaccinated लोकांमध्ये जाऊ नये म्हणून अमेरिकेा, इस्रायल, इंग्लंडने बुस्टर आणले.