मुंबई:संजय राऊत यांनी दोन ट्विट केली असून पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी "आयएनएस फसवणुक प्रकरण सोमैया बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. भाग सोमैया भाग!!" ( Bhaag Somaiya Bhaag ) असे म्हटले आहे. तर, एका वृत्तपत्राचे कात्रण पोस्ट करत केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत यांनी "तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा? मुझे रहजनोसे गीला तो हैं, पर तेरी रहबरी का सवाल हैं..", असे म्हटले आहे.
Sanjay Raut On Somaiya : 'इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला कैसे लुटा ? भाग सोमैया भाग' - संजय राऊत
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी भाजप नेते किरीट सोमैया (BJP leader Kirit Somaiya) यांचा आयएनएस विक्रांत घोटाळा (INS Vikrant scam) बाहेर काढल्या नंतर सध्या किरीट सोमैया व त्यांचे पुत्र निल सोमैया आऊट ऑफ नेटवर्क आहेत. त्यावरून आता संजय राऊत यांनी ट्विट करत 'भाग सोमय्या भाग' ( Bhaag Somaiya Bhaag ) असा खोचक टोला लगावला आहे.
सोमैया यांनी आयएनएस विक्रांतसाठी निधी संकलन मोहीम राबवली होती. जहाज वाचवण्यासाठी अनेकांनी सोमैया यांच्या मोहिमेत दानही दिले. सोमैया यांनी या कामासाठी 57 कोटींहून अधिक रुपयांचा निधी उभारला, मात्र, हा निधी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात जमा करण्याऐवजी त्यांनी निधीमध्ये भ्रष्टाचार केला, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
Last Updated : Apr 10, 2022, 8:23 PM IST