मुंबई - येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे सर्वत्र शहरात भीतीची वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जमावबंदीला घाबरू नका, कोणतीही नवीन बंधन नाहीत असे म्हणत लोकांना आवाहन केले आहे.
मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. जमावबंदीच्या काळात ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनी आज (गुरुवारी) संध्याकाळी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.