मुंबई - पितृपक्ष संपल्यानंतर भाजपने विधानसभेसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. पहिल्या यादीत एकूण १२५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात विद्यमान ५२ आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर १२ आमदारांची तिकिटे कापली आहेत. माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू डॉक्टर सुनील कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.
मुंबईतल्या वडाळ्याच्या जागेवरही बराच खल झाला होता. मात्र, ही जागा आता शिवसेनेकडून भाजपच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, शिवसेना सोडून काँग्रेस आणि आता पुन्हा भाजपमध्ये दाखल झालेल्या कालिदास कोळंबकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ भाजपने घातली आहे.
दोन मंत्री गॅसवर तर १२ आमदारांची भाजपने तिकिटे कापली - गणेश नाईक
पहिल्या यादीत एकूण १२५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात विद्यमान ५२ आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर १२ आमदारांची तिकिटे कापली आहेत.
दोन मंत्री गॅसवर तर १२ आमदारांची भाजपने तिकिटे कापली
तसेच, गणेश नाईक भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी मिळणार नसल्याचे चर्चिले जात होते. म्हात्रे या राष्ट्रवादीच्याही संपर्कात होत्या. मात्र, आता म्हात्रे यांची पुन्हा वर्णी लागली असून गणेश नाईक यांचे पुनर्वसन कसे करणार याचीच चर्चा होत आहे. गणेश नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी मिळालेली नसली तरी त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना ऐरोलीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.