मुंबई- संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारने जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कोणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचे काही कारण नाही. त्यामुळे घराबाहेर पडून आणखी कठोर पावले उचलायला भाग पाडू नका. कृपया घरीच रहा, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
'कठोर पावले उचलायला भाग पाडू नका, घरीच रहा'
संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारने जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडू नका, अन्यथा आणखी कठोर पावले उचलायला भाग पाडू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा -मुंबई : काळ्याबाजारासाठी साठवून ठेवलेले 15 कोटींचे मास्क जप्त, चौघांना अटक