मुंबई : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरून अनेकांना पोटदुखी सुरू आहे. काहीजण मुंबईतील विविध कामांचे ऑडिट करावे, अशी मागणी करत आहे. तुम्ही कितीही ऑडिट करा, आपली खुली किताब आहे. लोकांना दिलेल्या सोयी सुविधा यात दिसतील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाण सोडले. नगर विकास दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे मूल्यांकन करून पुरस्कार देण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांचे बाण यावेळी कोणाकडे होते, यावरून चर्चेचे फड रंगले आहेत. राज्याच्या दृष्टीने आजचा नगरविकास दिन अतिशय महत्वाचा दिवस आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते, की शहर चांगली दिसायला हवीत. शहराच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. राज्य सरकारचा नागरिकांच्या सोयीचा महाराष्ट्र कसा होईल, याकडे कल आहे. अधिकारी वर्गाने लोकसहभागातून कामे केल्यास बदल घडेल. प्रत्यकाने शहराच्या जिव्हाळ्यासाठी काम करावे. आज ग्रामीण भागातील शहराचे नागरीकरण होत आहे. त्यासाठी तयारी असायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केले.
राज्याला डबल इंजिनचा फायदा :राज्य सरकार कोणत्याही निर्णय घेते मात्र, त्यांची अंमलबजावणी प्रशासकीय स्तरावर होत असते. प्रशासनाने घेतलेले निर्णयाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक चळवळ उभी राहायला हवी. तसेच कोणतेही घेतलेले निर्णय कागदावर ठेवता पूर्ण व्हायला करावेत. राज्य सरकारने यासाठी भरगच्च निधीचे बक्षीस रक्कम दिली आहे. हा निधी शहराच्या विकासासाठी वापर करायला हवा, अशी तंबी मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आज शहरांनी आज एकमेकांसोबत स्पर्धा सुरू केली आहे. तेथे सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. राज्यात डबल इंजिन सरकार आल्यामुळे त्याचा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.