महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फ्री काश्मीर' फलकावरून महाराष्ट्रात वादंग, बॅनर झळकावणारी तरुणी म्हणते... - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्याचा निषेध देशभरात केला जात आहे. मुंबईतही रविवारी मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडिया येथे विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सोमवारी  महेक या मुंबईमधील विद्यार्थिनीने 'फ्री काश्मीर' चे फलक झळकावले. महेकने हे फलक का लावले? हे स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने थेट महेकसोबत बातचित केली होती. तिचे मत जाणून घेतले.

free kashmir banner maharashtra
'फ्री काश्मीर' फलकावरून महाराष्ट्रात वादंग

By

Published : Jan 7, 2020, 1:32 PM IST

Updated : Jan 7, 2020, 3:12 PM IST

मुंबई - दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'फ्री काश्मीरचे' फलक झळकवण्यात आले. हे फलक झळकवणारी विद्यार्थिनी महेकने आपली भूमिका 'ई टीव्ही भारत'कडे स्पष्ट केली आहे. तसेच आज तिने तिच्या फेसबुकवरून देखील तिची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, आता राजकीय वाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'फ्री काश्मीर' फलकावरून महाराष्ट्रात वादंग, बॅनर झळकावणाऱ्या तरुणीचे आहे 'हे' मत

जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्याचा निषेध देशभरात केला जात आहे. मुंबईतही रविवारी मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडिया येथे विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सोमवारी महेक या मुंबईमधील विद्यार्थिनीने 'फ्री काश्मीर' चे फलक झळकावले. महेकने हे फलक का लावले? हे देखील स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने थेट महेकसोबत बातचित केली होती. तिचे मत जाणून घेतले होते.

महेकने फेसबुक वॉलवरून दिले स्पष्टीकरण -

महेकने आपल्या फेसबुक वॉलवरून एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले. 'मी काश्मिरी नसून महाराष्ट्रीय आहे. आपल्याला जसे स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच स्वातंत्र्य काश्मिरच्या जनेतला द्यावे. तेथे इंटरनेट सेवा सुरू करावी', असे ती म्हणाली. मात्र, माझ्या फलक झळकवण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. त्यामुळेच हा वाद निर्माण झाला असल्याचे महेक म्हणाली.

महेकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल -

महेकविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील महेकने झळकवलेल्या फलकाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच गेट वे समोर झालेली निदर्शने देशविरोधी होती. यामध्ये फ्री काश्मीरच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामध्ये ठाकरे सरकारमधील जितेंद्र आव्हाड सहभागी होते, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.

फ्री काश्मीर बॅनरचा निषेध करताना किरीट सोमय्या

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काश्मीर स्वतंत्र करण्याच्या विरोधात असल्याचे सांगत त्याठिकाणी इंटरनेट व इतर सेवा सुरू करण्यासाठी असे फलक लावल्याचे आपण वाचल्याचे म्हटले आहे. यावरून आता या फलकाचे राजकीय पडसाद उमटू लागले असले तरी महेकचे म्हणणे काय आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

काय म्हणाली महेक -

काशीमरमधून मानवता कुठे तरी हरवली आहे. आपण येथे राहून त्या ठिकाणच्या अडचणी समजू शकत नाही. आपण स्वतंत्र आहोत त्याप्रमाणे काश्मीरमधील लोकांनाही स्वतंत्रता मिळाली पाहिजे. मी काश्मिरी नाही, मुंबईची आहे. तरीही हे बोलत आहे. काश्मिरी जनतेच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. गेले 150 दिवस त्याठिकाणचे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. आपण असे राहू शकत नाही. आपल्या लढाईत काश्मिरी नागरिकांना सोबत ठेवून त्यांना स्वातंत्र्य मिळावी इतकीच माझी मागणी आहे, असे महेक म्हणाली होती.

Last Updated : Jan 7, 2020, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details