मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक प्रचारात स्वत: निर्मिती केलेल्या व गेल्या काही वर्षांपासून विमान उड्डाणाच्या परवानगीसाठी प्रयत्नशील असलेल्या कॅप्टन अमोल यादववरून सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता यादव यांना विमान उड्डाणाची परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आली आहे.
अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील - Modi give permission Amol Yadav
राज ठाकरेंच्या टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिला होता. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार तीन दिवसांपूर्वी त्यांना डीजीसीएकडून ‘परमिट टू फ्लाय’ मंजुरी मिळाली.
राज ठाकरेंच्या टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिला होता. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार तीन दिवसांपूर्वी त्यांना डीजीसीएकडून ‘परमिट टू फ्लाय’ मंजुरी मिळाली. यादव यांनी डीजीसीएकडून १४ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या विमानाचे उड्डाण करता येईल. महिन्याभरात किंवा जास्तीत-जास्त दोन महिन्यांत या विमानाचे यशस्वी उड्डाण होणार आहे. यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाला १० तासांचे उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.