महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपने राणेंना गंडवले का? आता काय करणार राणे? - महाराष्ट्र विधानसभआ निवडणूक 2019

युती होणार की नाही याची जोरदार चर्चा होती. त्याच वेळी पुन्हा एकदा राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने उचल खालली. स्वत: राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. त्याच वेळी त्यांनी मुंबईत भाजप प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्यानंतरच्या नेत्यांचे भाजप प्रवेश झाले पण राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्तच सापडला नाही. आता तर युती झाली आहे. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपने राणेंना गंडवले का? आता काय करणार राणे ?

By

Published : Oct 1, 2019, 10:14 AM IST

Updated : Oct 1, 2019, 10:05 PM IST

मुंबई - युती झाली किंवा नाही झाली तरी आपला भाजप प्रवेश निश्चित होणार, असा विश्वास नारायण राणे यांनी वारंवार व्यक्त केला आहे. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. हे पहिल्यांदाच झाले नाही तर त्यांनी काँग्रेस सोडली त्या दिवसापासून भाजप नेते त्यांना खेळवत असल्याचेच स्पष्ट चित्र दिसत आहे. त्यात आता शिवसेना-भाजप युती झाली आहे. त्यामुळे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या नारायण राणेंचे काय होणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे राणेंच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले

हे ही वाचा - 'वंचित' कडून परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवार जाहीर; नवख्यांना संधी देऊन दिला धक्का

काय दिली होती आश्वासने-

नारायण राणे यांनी अचानक काँग्रेस पक्ष सोडला. त्यामागे ईडीचे कारणही त्यांच्या विरोधकांनी दिले. त्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची मुख्यमंत्र्यांसह भेटही घेतली होती. राणे हे भाजप प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, तेव्हाही भाजप प्रवेश होऊ शकला नाही. राणेंना विधान परिषदेवरही घेण्यात आले नाही. राणेंनी भाजपच्या सांगण्यावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. ते एनडीएचे घटक पक्षही झाले. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही राणे मंत्री होणार, असे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनीही राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खाते सोडण्यासही तयार असल्याचे वक्तव्य केले. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर लवकरच शपथविधी होणार असल्याचे वारंवार सांगितले. पण तसे काही झाले नाही. राणेंना करावी लागली ती फक्त आणि फक्त प्रतिक्षाच.

सांगितले एक केले एक-

शेवटी त्यांना मंत्रिपदाऐवजी थेट दिल्लीला राज्यसभेवर पाठवण्यात आले. राणेंना दिल्लीच्या राजकारणात काहीच रस नव्हता. तसे त्यांनी बोलूनही दाखले होते. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशाच आली. लोकसभा निवडणुकीतही भाजपने राणेंना साथ दिली नाही. परिणामी राणेंच्या मुलाला मोठा पराभव सहन करावा लागला. तरीही आक्रमक असलेले राणे शांत राहिले. त्यांना अजूनही मुख्यमंत्री आणि भाजपवर विश्वास होता.

हे ही वाचा - आघाडीच्या उमेदवाराचे नाव वंचितच्या यादीत; राजकीय क्षेत्रात खळबळ

शिवसेनेला विचारून निर्णय-


युती होणार की नाही याची जोरदार चर्चा होती. त्याच वेळी पुन्हा एकदा राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने उचल खालली. स्वत: राणे यांनी सिंधुदुर्गमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. त्याच वेळी त्यांनी मुंबईत भाजप प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या नंतरच्या नेत्यांचे भाजप प्रवेश झाले पण राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्तच सापडला नाही. आता तर युती झाली आहे. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेला विरोध करणाऱ्या किरीट सोमय्या यांनाही उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेला घ्यावी लागली होती. शिवसेनेची ती मागणी भाजपने मान्य केली होती. राणेंबाबतही तेच झाले. राणेंच्या प्रवेशाचा निर्णय शिवसेने बरोबर चर्चा करूनच घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले होते.

हेही वाचा - आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

आता पुढे काय?-


राणेंबाबतचा संपूर्ण घटनाक्रम पाहता भाजपकडून राणेंची दिशाभूल केल्याचे राजकीय तज्ञांना वाटत आहे. राणेंना फक्त भाजप नेत्यांनी खेळवले असा ही एक अर्थ काढला जातो. युती झाली नसती तर राणेंचा वापर भाजपला झाला असता. पण आता युती झाली आहे. त्यामुळे राणेंना भाजपने वाऱ्यावरच सोडले आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Last Updated : Oct 1, 2019, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details