मुंबई :आजपर्यंत मनुष्याच्या अनेक प्रेमकथा मोठ्या पडद्यावर बघायला मिळाल्या आहेत. परंतु रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी (unique love story of male and female buffalo) असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून; आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित (Motion poster displayed) करण्यात आले आहे. यात धोंडी-चंप्याला (Dhondi Champya Movie) लगीनघाई झालेली दिसून येते. या आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुनील जैन यांनी कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील आणि निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.