महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावीकर संतप्त! 'पुनर्विकाससंबंधी सरकारने दगड उचलण्याची वेळ आणू नये' - धारावी पुनर्विकास समिती

पुनर्विकासासाठी लोक आता जागरूक झाले आहेत. सरकारने तातडीने प्रकल्पाचे काम सुरू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

धारावीकर संतप्त

By

Published : Aug 19, 2019, 2:42 PM IST

मुंबई- धारावीचा पुनर्विकास 15 वर्षांपासून रखडल्यामुळे धारावी पुनर्विकास समिती आक्रमक झाली आहे. 90 फिट रोडवर जाहीर सभा घेत सरकारने आमच्यावर दगड उचलण्याची वेळ आणू नये, असा इशारा समितीचे निमंत्रक राजू कोरडे यांनी दिला.

'पुनर्विकाससंबंधी सरकारने दगड उचलण्याची वेळ आणू नये'

तसेच प्राधिकरणाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या सेकलिंक कंपनीस प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी सरकारने पत्र देत नाही. यामागे धारावी पुनर्विकासाचे काम अदानी कंपनीस देण्याचा षड्यंत्र असून राज्य सरकारने धारावीचा पुनर्विकास रखडवला असल्याचा आरोपही कोरडे यांनी केला.

धारावीचा पुनर्विकास तातडीने सुरू करावा, या मागणीसाठी धारावी पुनर्विकास समितीमार्फत 90 फिट रोडवर हिमालय हॉटेल शेजारी सभा आयोजित केली होती. या सभेत कोरडे बोलत होते. या सभेला धारावीतील हजारो लोक उपस्थित होते. यावेळी कोरडे म्हणाले की काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना भाजप सरकारने हा प्रकल्प जाणीवपूर्वक रखडवला आहे. पंधरा वर्षांहून अधिक काळ प्रकल्प रखडला आहे. धारावीकरांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे सरकारने प्रकल्पाचे काम तरी सुरू करावे किंवा एसआरए प्रकल्पाचे प्रस्ताव स्वीकारावे.

पुनर्विकासासाठी लोक आता जागरूक झाले आहेत. सरकारने तातडीने प्रकल्पाचे काम सुरू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details