मुंबई :गुजरातची रहिवासी असलेली अरिहा शाहा 20 महिन्यांपासून जर्मनीत अडकली आहे. तेथे तीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मुलीच्या पालकांवर आरोप करून मुलीची रवानगी कोठडीत करण्यात आली. मात्र, नंतर फौजदारी आरोप वगळण्यात आले. आता या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी मुलीला लवकरच भारतात आणण्याचे आश्वासन दिले आहे.
मुलीचा ताबा भारत सरकारला देण्याची विनंती : जर्मनीत अडकलेल्या गुजरातच्या अरिहा शाहचे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने मोदी सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या मुलीला 20 महिने बर्लिनमध्ये ज्या केंद्रात ठेवण्यात आले होते, त्या केंद्रातून तिला आता दुसरीकडे पाठवण्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याचबरोबर या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने अरिहाला लवकरच भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, आम्ही जर्मन सरकारला मुलीचा ताबा भारत सरकारला देण्याची विनंती केली आहे.
शारिरीक अत्याचाराचा आरोप :अहमदाबादची अरिहा शाह गेल्या २७ महिन्यांपासून जर्मनीमध्ये आहे. जेव्हा ती 7 महिन्यांची होती तेव्हा तिला जर्मनी युथ वेलफेअरच्या पाळणाघरात पाठवण्यात आले होते. अरिहा शाहवर पालकांनी शारिरीक अत्याचाराचा आरोप होता. मात्र, नंतर हे आरोप खोटे ठरले गेले. मुलीचा ताबा मिळवण्यासाठी वडील भावेश शाहसर आई धारा शहा यांनी रात्रंदिवस या प्रकणाचा पाठपुरवठा केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.
आम्ही जर्मनीला मुलगी अरिषा शाह भारतात परत करण्याची विनंती करत आहोत. ती भारतीय नागरिक आहे. 2021 मध्ये, जेव्हा ती 7 महिन्यांची होती, तेव्हापासून तिला जर्मनीच्या युथ वेलफेअरच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. मुलगी गेल्या 20 महिन्यांपासून केअर होममध्ये आहे. - अरिंदम बागची,प्रवक्ते परराष्ट्र मंत्रालय
'अरिहाबाबत कोणतीही तडजोड नाही' : ते म्हणाले, आमच्या दूतावासाने जर्मन अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली आहे. आमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमीशी अरिहाचा संबंधी तडजोड होणार नाही. आरिहाला लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, हा एक भारतीय नागरिक म्हणून तिचा हक्कही आहे, असे आम्ही जर्मन अधिकाऱ्यांना आवाहन करतो. आरिया शाहचे भारतात परतणे सुनिश्चितकरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे बागिची म्हणाले.
'जर्मन अधिकारी भारतीय दूतावासाच्या संपर्कात' : अरिहाच्या पालकांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना भेटण्याची वारंवार मागणी केल्यानंतर हे वक्तव्य आले आहे. अरिहाचे पालक हस्तक्षेप करण्यासाठी भारतातील अधिकाऱ्यांना सतत भेटत आहेत. त्यावर जर्मन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते बर्लिनमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.
धारा शाह यांनी सांगितली संपूर्ण घटना : अरिहा शाहची आई धारा शाह यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की मुलगी आता 27 महिन्यांची आहे. ती 20 महिने माझ्यापासून दूर आहे. जेव्हा बाळ 7 महिन्यांचे होते, तेव्हा मला तिच्या डायपरमध्ये रक्त दिसले. यावर मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी 'ऑल इज वेल' म्हणत आम्हाला परत पाठवले. त्यानंतर आम्ही पाठपुरावा करण्यासाठी गेलो असता त्यांनी बाल संगोपन सेवेला फोन करून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले. कुटुंबावर असभ्य, खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमच्यावर मुलीच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले. पण, आम्ही प्रामाणिक होतो. कारण आम्हीच तीला डॉक्टरांकडे नेले होते.'ज्या हॉस्पिटलने आरोप केले त्यांनीच ते आरोप नंतर फेटाळले', असे धारा शाह यांनी म्हटले आहे.
लैंगिक शोषणाला नकार :कोणताही भारतीय आपल्या मुलासोबत किंवा कोणाच्याही मुलासोबत असा विचार करू शकत नाही? सर्व गोष्टींची पडताळणी झाली. ज्या हॉस्पिटलने चाइल्ड केअर म्हटले होते, त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये अहवाल दिला. त्या अहवालात त्यांनी लैंगिक शोषणाला नकार दिला होता. मुलीचे वडील आणि आजोबांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये पोलिसांनी हे प्रकरण बंद केले. या लोकांचा जो काही गैरसमज होता, तो दूर झाला आहे, असे आम्हाला वाटले. आता मुलगी आम्हाला दिली जाईल असे वाटले मात्र, चाइल्ड केअरने आमच्यावर केस चालू ठेवली.
अनेक पालकांवर असे आरोप :अनेक भारतीय पालकांना या आरोपांचा सामना करावा लागला आहे. मुलांना पालकाच्या ताब्यातून पाळणाघरात पाठवण्यात आले आहे. प्रत्येक वेळी देशाच्या पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून आपल्या समकक्षांशी चर्चा केली तर मदत होईल अशी अशा धारा यांनी व्यक्त केली आहे. कौटुंबिक न्यायालयाने आमचा पालक क्षमतेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल 12 महिन्यांत तयार करण्यात आला. या अहवालात म्हटले आहे की, मुलगी तिच्या पालकांना फक्त तासभर भेटते. दिवसभर ती बालसंगोपनात घालवते. तरीही तो पालकांशी अधिक जोडलेला आहे. आई-वडिलांशी जोडले जाणे स्वाभाविक आहे. मुलीला अॅटॅचमेंट डिसऑर्डर आहे, असा त्यांचा वाद आहे. भारतीय मुल अनोळखी लोकांमध्ये मिसळते. भारतीय आणि पाश्चात्य या मधील हा फरक आहे. त्यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की,मुल पालकांसह खूप आनंदी आहे. ती अजिबात घाबरत नाही. म्हणूनच मुलीला पालकच्या ताब्यात द्याला हेवे असा अहवाल देण्यात आला आहे.
'मुलाशी खेळण्यासारखे वागणे' : गुजरात सरकारने एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ती मुलगी भारतीय नागरिक आहे. आम्हाला तीला भारत सरकारच्या देखरेखीखाली ठेवायचे आहे. यासंदर्भात जर्मन न्यायालयाच्या आदेशाची आम्ही वाट पाहत होतो. गेल्या आठवड्यात कळले की जर्मन चिल्ड्रन सर्व्हिसने या मुलीला 20 महिने ठेवलेल्या ठिकाणाहून उचलून दुसऱ्या संस्थेत पाठवले आहे. तील्या ज्या केंद्रात पाठवले ती केंद्रे मतिमंद मुलांसाठी आहेत. त्यांच्याकडे मुलीला संभाळण्यासाठी संसाधने नाहीत. जर त्यांच्याकडे मुलाला ठेवण्याची क्षमता नसेल तर, ते तिच्याशी खेळण्यासारखे का वागतात असा सवाल मुलीच्या आईने विचारला आहे. माझा भारत सरकारवर विश्वास आहे. मी विनंती करतो की पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर माझी मुलगी लवकरच परत येईल अशी अशा धार शाह यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - CM Letter To S Jaishankar : आरिहा शाह प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र