महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनंजय मुंडेंनी कवितेतून चौकीदार अन् शिवसेनेवर साधला निशाणा, म्हणाले... - ट्विट

धनंजय मुंडे यांनी आज होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

धनंजय मुंडेंचे ट्विट

By

Published : Mar 21, 2019, 5:43 PM IST

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा दिल्या.

मोदी यांच्यावर मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्यासोशल मीडियावरील कमेंट आणि त्यावरील कवितांचा आधार घेत मुंडे यांनी मोदींना रंग बदलनेवालो को होली कि शुभकामनाए, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

कभी तू फकीर लगता है
कभी आवारा लगता है
कभी तू चायवाला लगता है
कभी चोर चौकीदार लगता है

ही कविता लिहित त्यांनी मोदींना शुभेच्छा देत बुरा ना मानो होली है, असे ट्विट केले. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून 'दमलेल्या बाबाला' वाघ शेळीचा खेळ खेळत अनेक वेळा आपले रंग बदलून सर्वांना चकित करणाऱ्या शिवसेनेला ही त्यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details