मुंबई- अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होण्याआधीच बाहेर पडला असून हा दोन्ही सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली.
अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरुन अर्थसंकल्प फुटला; सरकारने माफी मागावी- धनंजय मुंडे - वित्तमंत्री
अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटला असून सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थसंकल्प सभागृहाच्या बाहेर फोडल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे केली आहे. सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी सभागृहात पुराव्यानिशी सादर केली.
धनंजय मुंडे म्हणाले की, लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अर्थसंकल्प फोडण्यात आला आहे. अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पातील गोष्टी ट्विट केल्या जात होत्या. या गोष्टी जाहिरातीसहीत ट्विटवर प्रसिद्ध केल्या जात होत्या. असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.
सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी सभागृहात पुराव्यानिशी सादर केली. यावेळी अर्थसंकल्प सादर करतानाच तो सोशल मीडियावर कसा येवू शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला