मुंबई - 'मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन' असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. ज्ञानसाधनाही इतक्या थाटामाटात करतात हे मोदी साहेबांमुळे जगाला कळलं असणार. निवडणुकींच्या निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना, असेही मुंडे म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या उत्तराखंड दौऱ्यावर सर्वच राजकीय पक्षांनी टीका केली आहे. धनंजय मुंडेंनीही मोदींवर निशाणा साधताना 'मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन' असे म्हटले आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी हे केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर आहेत. यावेळी मोदींनी जवळपास १७ ते १८ तास केदारनाथमध्ये एका गुफेमध्ये ध्यानधारणा केली.