मुंबई - बोलबच्चन मुख्यमंत्र्यांना परभणीकरांनी गप्पच बसवले, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. आहे का तुमच्यात परभणीकरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत? कुठे गेली तुमची पीक विम्याची योजना, किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले? हिंमत असेल तर खरे आकडे सांगा, असे प्रश्न उपस्थित करून मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
बोलबच्चन मुख्यमंत्र्यांना परभणीकरांनी बसवले गप्प, धनंजय मुंडेंचा निशाणा
बोलबच्चन मुख्यमंत्र्यांना परभणीकरांनी गप्पच बसवले, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण 5 वर्षांत काय काय विकास केला? हे सांगण्यासाठी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू आहे. ही महाजनादेश यात्रा परभणीत आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी उपस्थितांनी एकच गोंधळ घातला. जरा पीक विमा आणि कर्जमाफीवर बोला, असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.
5 वर्षांच्या सत्ताकाळात आपण राज्यात कोणती प्रगतीशील कामे केली हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा सुरू असल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेला पीक विमा आणि कर्जमाफीसारख्या महत्वाच्या मुद्दयावर मुख्यमंत्री बोलत नव्हते. आज याच विषयीच्या शेतकऱ्यांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं असल्याचे मुंडे म्हणाले.