महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकारचा कारभार पाहून 'रामगढ के शोले' ची आठवण, धनंजय मुंडेंची सरकारवर खोचक टीका - vidhanparishad

दुष्काळात राज्य सरकारचा कारभार आम्ही पाहीला असून, त्यावरुन 'रामगढ के शोले' चित्रपटाची आठवण होत असल्याचे खोचक वक्तव्य करत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली.

धनंजय मुंडेंची सरकारवर खोचक टीका

By

Published : Jun 19, 2019, 5:48 PM IST


मुंबई -दुष्काळात राज्य सरकारचा कारभार आम्ही पाहीला असून, त्यावरुन 'रामगढ के शोले' चित्रपटाची आठवण होत असल्याचे खोचक वक्तव्य करत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली. राज्यपाल महोदयांच्या बद्दल आदर असता तर त्यांच्या तोंडी खोट्या गोष्टी घातल्या नसत्या असेही मुंडे म्हणाले.

विधानपरिषदेत बोलताना धनंजय मुंडेंनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अमीर खानने चौकीदाराची संगीतलेली गोष्ट सांगत सरकारची खिल्ली उडवली. चौकीदार रात्री सगळयांना ऑल इज वेल म्हणायचा,पण तो आंधळा होता. असेच भाषण या आंधळ्या सरकारने केले असल्याचे मुंडे म्हणाले.

राज्यपालांच्या भाषणातून कोणतेही दिशादर्शन झाले नाही. शेतकरी, बेरोजगार यांची निराशा झाली आहे. धनगर, मराठा, मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असल्याचे मुंडे म्हणाले.

पाकिस्तानला अनेकदा धुळ चारली पण राजकारण केले नाही

शहिदांच्या नावाने तुम्हाला मत मागावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना पाकिस्तानला आम्ही अनेकदा धूळ चारली पण त्याचे राजकारण केले नसल्याचे मुंडे म्हणाले. पैसे, ईव्हीएम मॅनेज करून पुढे विधानसभा जिंकू असे समजत असाल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहता असेही मुंडे म्हणाले.

दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत

साडेचार वर्षात वादे पूर्ण करता आले नाहीत, म्हणून आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना दाम दुप्पट करण्याचे वादे पूर्ण करण्यासाठी मुदत दिली जात आहे. शेतकरी सरकारच्या विरोधात पत्र लिहून आत्महत्या करत आहेत. दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारची आधारभूत योजना फसली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तूर, उडीद याचे पैसे सरकराने दिले नाहीत. तरीही सरकार ऑल इज वेल म्हणत असल्याचे मुंडे म्हणाले.

आज कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याला 1400 कोटी रुपये अनुदान द्यायचे असताना केवळ 104 कोटी दिले आहेत. जलयुक्त शिवारमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 22 हजार खेडी दुष्काळमुक्त केली तर मग ही कामे कुठे केली असा सवालही मुंडेनी यावेळी केला.

72 हजार जागा भरण्याचे जाहीर करून 8 महिने उलटले तरी अद्याप एकही जागा भरली नाही. त्याचीही खोटी माहिती राज्यपालांच्या भाषणात दिली आहे. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन दिले असते तर शेतकऱ्यांनी सरकारचे अभिनंदन केले असते असेही मुंडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details