महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वडाळ्याच्या राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात; भाविकांची गर्दी - mumbai

डाळा, येथील प्रसिद्ध राम मंदिरांसह मुंबईतील विविध मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा केला गेला. सूर्योदय झाल्यानंतर रामजन्माचा सोहळा सुरू झाला. रामाला पाळण्यात घालून पाळणे गायले गेले.

वडाळ्याच्या राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात

By

Published : Apr 13, 2019, 11:38 AM IST


मुंबई- चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीचा उत्सव मुंबईसह वडाळा येथे आज पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची मंदिरे तसेच हनुमान मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच भजन, कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो आबालवृद्ध भाविक त्यात सहभागी होताना दिसत आहेत.

वडाळ्याच्या राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात


वडाळा, येथील प्रसिद्ध राम मंदिरांसह मुंबईतील विविध मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा केला गेला. सूर्योदय झाल्यानंतर रामजन्माचा सोहळा सुरू झाला. रामाला पाळण्यात घालून पाळणे गायले गेले. त्यानंतर पालखी मिरवणुकाही काढल्या गेल्या. वडाळा येथील राम मंदिरातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. पहाटे रामनवमी निमित्ताने मुंबईतून अनेक ठिकाणाहून भाविक राम देवाच्या दर्शनासाठी वडाळा राममंदिर येथे येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details