महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन - bal thackeray

मातोश्रीवर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही निमंत्रण स्वीकारत शिवसेनेच्या वर्धापन दिनाला येण्यास संमती दर्शवली आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Jun 18, 2019, 10:13 PM IST

मुंबई - शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. उद्या संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे आणि फडणवीस सायन येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

मातोश्रीवर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही निमंत्रण स्वीकारत शिवसेनेच्या वर्धापन दिनाला येण्यास संमती दर्शवली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युतीच्या रणनितीचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांचे मार्गदर्शनपर भाषणही होणार आहे. लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभाही शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन लढवावी आणि मोठा विजय मिळवावा यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details