मुंबई- राज्यातले दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटरचे स्टेटस बदलले आहे.
अगोदर मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर महाराष्ट्र सेवक असे स्टेटस ठेवले होते. आता त्यानंतर परत एकदा महाराष्ट्र मुख्यमंत्री असे स्टेटस ठेवण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली.
देवेंद्र फडणवीसांचे ट्विटर स्टेटस बदलले हेही वाचा -'अजित पवार पुन्हा येणार, चंद्रकांत पाटलांसह 35 आमदार आमच्या संपर्कात'
राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतल असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीस व पवार यांचे अभिनंदन केले. राज्यात शिवसेनेबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करेल, अशी शक्यतांच्या फेऱ्या सुरू होत्या. तेवढ्यात हा राजकीय भूकंप झाला आहे.