मुंबई- राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली, असे सांगितले. तसेच आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू - देवेंद्र फडणवीस - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, शिवसेनेने इतर पक्षांसोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे सरकार चालू शकत नाही, असे सरकार देण्याचा प्रयत्न केला, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस
यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, शिवसेनेने इतर पक्षांसोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे सरकार चालू शकत नाही, असे सरकार देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीच्या संपूर्ण गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे की, अजित पवारांचा गट फुटला आहे, हे समोर आले नाही.
Last Updated : Nov 23, 2019, 8:58 AM IST