महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शक्ती कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी; मात्र अत्याचार प्रकरणात मंत्र्यांचीच नावे समोर

राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी नवा शक्ती कायदा आणला आहे. मात्र, महिला अत्याचाराच्या प्रकरणात मंत्र्यांचीच नावे समोर येत आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजप शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे आमदार राजीनामा देतील, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

मुंबई
मुंबई

By

Published : Feb 28, 2021, 4:40 PM IST

Updated : Feb 28, 2021, 5:19 PM IST

मुंबई- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक ऑडिओ क्लिप तसेच फोटो असतानाही राठोड यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी फडणवीस यांनी केली आहे.

पत्रकार परिषद

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक ऑडिओ क्लिप असताना कारवाई होत नाही. यात मी संजय राठोड यांना दोष देणार नाही, तर राठोड यांच्यावर वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत आणि राठोड राजीनामा देत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात नवा कायदा आणला आहे. मात्र, महिला अत्याचाराच्या प्रकरणात मंत्र्यांचीच नावे समोर येत आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजप शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे आमदार राजीनामा देतील, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

कोविड केंद्र घोटाळ्याची पुस्तिका काढणार

अधिवेशन काळात कोविड केंद्र घोटाळ्याची पुस्तिका काढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोविड केंद्रांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा भ्रष्टाचार अधिवेशन काळात समोर आणणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाची सुनावणी 8 तारखेला होत आहे. याच मुद्द्यावर आम्ही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहोत. आरक्षणाचा संपूर्ण विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे. केंद्र सरकारचा यात कोणताही सहभाग नाही, मात्र केंद्राकडून काही मदत लागल्यास आम्ही त्यासाठी पूर्णपणे मदत करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या प्रकरणी राज्य सरकारने टोलवाटोलवी करू नये ही अपेक्षा, असाही टोला त्यांनी लगावला. वीजबिलाचे संकट राज्य सरकारने लादलेले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर राज्य सरकारने शेतकऱ्यांना ठोस अशी मदतही केली नसल्याचे माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Last Updated : Feb 28, 2021, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details