मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठिशी घालण्याचा डाव फसला, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबई पोलीसचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहिले आहे. त्यात १०० कोटींच्या हफ्ता वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात परमबीर यांचे दावे खोटे असल्याचे सांगितले. देशमुख खासगी विमानाने मुंबईला आले. १५ तारखेपासून ते घरी होते. पोलिसांच्या मुहमेंटनुसार १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता अनिल देशमुख सह्याद्रीवर होते. तर २४ तारखेला ११ वाजता ते मोटारीने मंत्रालय आणि निवासस्थान असा कार्यक्रम होता. परमबीर यांनी पत्र लिहीले त्यात व्हॉट्सअॅपचा पुरावा दिला आहे. १५ ते २७ या कालावधीत गृहमंत्री होम क्वारंटाईन नव्हते. त्यांना अनेक लोक भेटले आहेत. शरद पवारांना योग्य ब्रिफ केले नाही. त्यांना चुकीची माहिती दिली गेली. यामुळे पवार उघडे पडले आहेत आणि पवारांचा देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न फसला, असा दावा फडणवीसांनी केला.
हेही वाचा -अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी